कोटा - चांगल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा, म्हणून देशभरातील विद्यार्थी राजस्थानच्या कोटा शहरात प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी येतात. प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, परीक्षेचा तणाव आदी कारणांमुळे जेईई, नीट परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कोटा येथे शनिवारी आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गत सहा महिन्यात कोट्यात १६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
आत्महत्येचे वाढते प्रमाणजेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र झालेल्या कोट्यात गतवर्षीही १५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. हे प्रमाण वाढतच असून यंदा सहा महिन्यातच १६ आत्महत्या झाल्या.
दोन दिवसांत दोन आत्महत्याकोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असून सलग दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
पाच वर्षांत ७० मृत्यूप्रवेश परीक्षेचे हब असलेल्या कोट्याची ओळख आता आत्महत्येची केंद्र अशी होऊ लागली. कोटा येथे मागील पाच वर्षांमध्ये ७० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.
कोट्यवधींची बाजारपेठजेईई, नीटचे १५० हून अधिक कोचिंग इन्स्टिट्यूट, दरवर्षी २.५ लाख विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात. शहरात २५,००० पेईंग गेस्ट आणि ३,००० पेक्षा जास्त होस्टेल, वार्षिक ३ ते ४ हजार कोटींची उलाढाल, पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध
आत्महत्यांची प्रमुख कारणेपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वासाचा अभावपालकांच्या तीव्र अपेक्षाअभ्यासाचा तणावआर्थिक अडचणप्रेमप्रकरण