थंडीपासून काहीसा दिलासा
By admin | Published: January 14, 2017 12:06 AM
नाशिक : गेल्या सप्ताहात तीन वेळेला राज्यातील सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने कुडकुडणार्या नाशिककरांना आज काहीअंशी दिलासा मिळाला. पारा ५ अंशवरून ७.५ इतका आल्याने हुडहुडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ६.४ आणि ७.५ अंश सेल्सिअस इतके कमी तपमान नोंदले गेले होते. राज्यातील हे सर्वात नीचांकी तपमान ठरले आहे. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा पारा घसरला आणि ५ अंशावर जाऊन पोहोचला. त्यामुळे सतत कडाक्याची थंडी सोसणार्या नाशिककरांना काही काळ दिलासा मिळाला. शुक्रवारी किमान ७.५ अंश सेल्सिअस तपमान असले तरी गारवा कमी असल्याने थंडी जाणवली नाही.
नाशिक : गेल्या सप्ताहात तीन वेळेला राज्यातील सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने कुडकुडणार्या नाशिककरांना आज काहीअंशी दिलासा मिळाला. पारा ५ अंशवरून ७.५ इतका आल्याने हुडहुडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ६.४ आणि ७.५ अंश सेल्सिअस इतके कमी तपमान नोंदले गेले होते. राज्यातील हे सर्वात नीचांकी तपमान ठरले आहे. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा पारा घसरला आणि ५ अंशावर जाऊन पोहोचला. त्यामुळे सतत कडाक्याची थंडी सोसणार्या नाशिककरांना काही काळ दिलासा मिळाला. शुक्रवारी किमान ७.५ अंश सेल्सिअस तपमान असले तरी गारवा कमी असल्याने थंडी जाणवली नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासूनच नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. तपमानात सातत्याने चढ उतार झाला असला तरी नाशिक हे राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून नोंदले गेले. डिसेंबरपासून कडाक्याचा वाढलेला जोर कायम आहे. जानेवारीतही नाशिककरांना कडाक्याची थंडी सोसावी लागत आहे. या थंडीचा परिणाम द्राक्षपिकावर होऊ लागला आहे. शेतकर्यांना द्राक्ष पीक वाचविण्याची चिंता लागली आहे. विशेषत: निफाड तालुक्यातील शेतकरी द्राक्षपिकाच्या नुकसानीमुळे चिंतेत आहेत.