Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:35 PM2018-08-13T13:35:48+5:302018-08-13T13:36:40+5:30
Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत.
मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी कोलकात्यामध्ये निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. राजकीय विचारधारेनुसार ते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. मात्र त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांना नेहमीच सर्वांनी आदराचे स्थान दिले.
किपिंग द फेथ:मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत. आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी केली परंतु त्यांना तो परत मिळालाच नाही. पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली. रे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री ओम मेहता यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले. मात्र ओम मेहता आणि सिद्धार्थ शंकर रे यांची याबाबतीत मदत मिळाली नाही.
#SomnathChatterjee Deeply saddened on his death. He was a very knowledgeable & straight forward person.On his passing away, I have lost not only a very friendly person but d country has lost a distinguished Parliamentarian & a veteran leader. Heart felt condolences to his family.
— SHARAD YADAV (@SharadYadavMP) August 13, 2018
अखेर आणीबाणी संपल्यावर नवे जनता सरकार केंद्रामध्ये सत्तेत आले. आतातरी आपल्याला पासपोर्ट मिळेल असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना पासपोर्ट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनी चॅटर्जी यांची समस्या जाणून घेतली आणि त्याच संध्याकाळी चॅटर्जी यांना पासपोर्ट मिळवून दिला. पासपोर्ट मिळाला म्हणजे स्वातंत्र्यच मिळाल्यासारखा आपल्याला आनंद झाला असे चॅटर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
Extremely saddened to hear about the passing of #SomnathChatterjee, former Speaker - Lok Sabha. He was part of the golden jubilee celebration of Thalaivar Kalaignar in 2007 and was a well-wisher of our party. On behalf of the DMK, I convey our heartfelt condolences to his family.
— M.K.Stalin (@mkstalin) August 13, 2018
अर्थात असे असले तरी सोमनाथ चॅटर्जी यांनी आपल्या राजकीय भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही. सर्वच पक्षांच्या सरकारच्या चुका दाखवून देण्यात आणि योग्यवेळी टीका करण्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली रालोआ सरकार सत्तेत आल्यावर अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हाही चॅटर्जी यांनी आपली विरोधी पक्षातील खासदाराची भूमिका व्यवस्थित पार पाडली.
India has lost a towering personality in the field of public life. An institution onto himself, #SomnathChatterjee had always inspired with his honesty, integrity and commitment for the nation. My condolences to his family and well-wishers.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) August 13, 2018