मुलगा झाल्याचं समजलं आणि त्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनाही फोन करून मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली आणि मिठाईही वाटली. मात्र यानंतर यानंतर तुम्हाला मुलगा नाही, तर मुलगी झाली असं सांगितलं तर काय होईल? अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले आणि तिला दाखल केलं. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मुलगा झाल्याची माहिती दिली.
मुलाच्या जन्माच्या आनंदात कुटुंबाने जल्लोष झाला. कुटुंबीयांनी आनंदाने रुग्णालयातील कर्मचाऱ्याला एक हजार रुपये बक्षिस दिले. सर्व नातेवाईकांना फोनवरून मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली. सर्वांनी मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पण त्यांचा मुलगा झाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कापडात गुंडाळून ऑपरेशन थिएटरमधून मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घरच्यांनी कापड काढून पाहिले असता त्यात मुलाऐवजी मुलगी होती. यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलाला बदलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलगा झाल्याचं त्यांना सांगण्यात आल्याचं नातेवाईकांचे म्हणणं आहे. टीप म्हणून एक हजार रुपयेही घेतले, पण नंतर मुलाची जागा मुलीने घेतली. कागदपत्रांवर मुलगा जन्माला आल्याचं म्हटलं आहे. प्रकरण वाढल्यानंतर रुग्णालयाने कागद बदलून त्यावर मुलीच्या जन्माची माहिती नोंदवली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. नातेवाइकांनी मुलीला सोबत नेण्यास नकार दिला. जोपर्यंत मुलीची डीएनए चाचणी होत नाही तोपर्यंत ते तिला घरी घेऊन जाणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, त्यांनी रेकॉर्ड तपासले आहे, रुग्णालयात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. कॅलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. नारायण प्रसाद यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तक्रारदार अजित यांचा दावा आहे की, त्यांना पहिल्यांदा मुलगा झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. तर दुसरीकडे डॉ. प्रसाद यांनी हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडल्यास नकार केला आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.