उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील सरकारी रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिथे एक हतबल मुलगा वडिलांना उचलून घेऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाताना दिसला. याच दरम्यान व्यक्तीला रुग्णालय प्रशासनाकडून कोणतंही स्ट्रेचर देण्यात आलं नाही, तसेच उपचारही करण्यात आले नाहीत.
निराश होऊन मुलगा आपल्या वडिलांना उचलून घेऊन निघून गेला. ग्रामीण भागातील पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा लवकरच सुधारेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
31 ऑक्टोबर रोजी नगरमध्ये राहणारा पुष्पेंद्र त्याच्या वडिलांना शिवली येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन आला. कसेबसे तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचला आणि डॉक्टर तिथे नसल्याचे कळले. त्यानंतर तो निराश होऊन घरी परतला.
रुग्णालयात ना स्ट्रेचर मिळाले ना डॉक्टर
6 महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती. जिथे त्यांनी आरोग्य व्यवस्थेवरून अधिकाऱ्यांना फटकारलं होतं. याबाबत जिल्ह्यातील एकही आरोग्य अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. सरकारी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतानाच काँग्रेसने उपमुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.