गोवा- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गोव्यामध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहताशी साखरपुडा झाला आहे. श्लोका ही आकाशची लहानपणापासूनची मैत्रीण आहे.अंबानी आणि मेहता कुटुंब एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. ते दोघेही धीरूबाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत एकत्र शिकायला होते. त्याच वेळी दोघांच्या या बालमैत्रीच प्रेमात रुपांतर झालं. अखेर त्यांचा आज साखरपुडा पार पडला आहे. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधून कायद्यात पदवी संपादन केली आहे. सद्यस्थितीत श्लोका ही वडिलांच्या रोझी ब्ल्यू फाऊंडेशनचं काम सांभाळते. डिसेंबरमध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचीही चर्चा आहे.श्लोका ही रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. आकाश आणि श्लोकाचा गोव्यातल्या एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये साखरपुडा पार पडला आहे. श्लोका ही देशातील सर्वात मोठे हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. येत्या डिसेंबर महिन्यात आकाश व श्लोका विवाहबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे.
मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात साखरपुडा, 'ही' देशातल्या सर्वात श्रीमंत घराण्याची सून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 3:31 PM