शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सोनल मानसिंग, राकेश सिन्हा यांच्यासह चार जण राज्यसभेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:24 AM

प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि दलित समुदायातील शेतकरी नेते राम शकल यांचीही राज्यसभेवर वर्णी लागली आहे. पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे.या नियुक्त्यांमुळे शरद यादव यांची एक जागा वगळता राज्यसभेच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. नियुक्त सदस्यांचा कालावधी सहा वर्षे असेल. राज्यसभेवर १२ नियुक्त सदस्य असतात. त्यापैकी ११ जणांच्या नेमणुका मोदी सरकारने केल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ मध्ये नियुक्त झालेले कायदेतज्ज्ञ के. टी. एस. तुलसी हे एकमेव सदस्य मागील संपुआ सरकारच्या काळातील आहेत.राम शकल (५५) उत्तर प्रदेशातील असून, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा तीनदा ते लोकसभा सदस्य होते. दलित समुदायाकडे लक्ष आहे, असा संदेश त्यांच्या नियुक्तीने मोदी सरकार देऊ इच्छिते. संघाशी संबंधित राकेश सिन्हा टीव्ही वाहिन्यांवर मोदी सरकारचे समर्थन करताना दिसतात, तर ७५ वर्षीय सोनल मानसिंग गुजराती असून, त्या भरतनाट्यम व ओडिशी नृत्यात पारंगत आहेत. रघुनाथ मोहापात्रा (७५) ओडिशातील पाषाण शिल्पकार आहेत.या नेमणुकानंतर राज्यसभेतील रालोआचे संख्याबळ ११० होईल. सुब्रमण्यम स्वामी, रूपा गांगुली, सुरेश गोपी व संभाजी राजे, या नामनियुक्त सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मेरी कोम (मणिपूर), स्तंभलेखक स्वपन दासगुप्ता (प. बंगाल) आणि नरेंद्र जाधव (महाराष्ट्र) हे सदस्यही कसोटीच्या काळात रालोआसोबत असतील, असे दिसते.उपसभापतीपदाच्या विजयासाठी एकूण १२३ मतांची गरज आहे. बीजदला उपसभापतीपद देऊन आपल्या बाजूने वळविण्याची खेळी भाजपा खेळू शकते. उपसभापतीपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरू आहे.>सहमतीचे प्रयत्नउपसभापतीपदाच्या निवडणुकीत सहमती व्हावी, असे भाजपाला वाटते. यासाठी भाजपाने आटोकाट प्रयत्न सुरु केले आहेत. या २४४ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे ११० सदस्य आहेत. निवडणूक झाल्यास बीजदचे ९, टीआरएसचे ६ आणि वायएसआर-काँग्रेसचे दोन सदस्य महत्त्वाची भूमिका बजावतील. विजयासाठी १२३ मतांची गरज आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद