नवी दिल्ली : कमी कालावधीत दमदार कामगिरी करणाऱ्या सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी पुढाकारघेतला आहे. कंपनीकडून केरळला १ कोटी रुपये व ५ ट्रॅक्टर्स देण्यात आले आहेत.सोनालिका ट्रॅक्टर्सकडून शेतक-यांसाठी नवनवीन उत्पादने सातत्याने बाजारात आणली जातात. यामुळेच ग्राहक केंद्रित व समाज केंद्रित म्हणून कंपनीची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख कायम ठेवत कंपनीने केरळला मदत देऊ केली आहे.याबाबत सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमन मित्तल म्हणाले, कंपनी समाजाशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलीआहे. त्यामुळे पुरात उद्ध्वस्त झालेल्या केरळला पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तेथील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तसेच नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शक्य त्या प्रत्येक मार्गाने कंपनी मदत करेल. सोनालिका ग्रुपचे अध्यक्ष मुदीत गुप्ता यांनी या मदतीचा धनादेश व ट्रॅक्टरचे छोटे मॉडेल प्रतीक म्हणून केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना दिले.५ ट्रॅक्टर्स हे बहुउद्देशीय हेवी ड्युटी प्रकारातील असतील. हे सर्व ट्रॅक्टर्स बहुउद्देशीय वापराचे असल्याने त्यांचा केरळमधील पायाभूत सुविधा उभारणीसाठी उपयोग होऊ शकेल.
पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीचा पुढाकार, १ कोटी रुपये व ५ ट्रॅक्टर्सची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 2:55 AM