नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात गांधी कुटुंबाला गोवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूअसताना माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्थनी हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘संपुआ’ सरकारांच्या दोन्ही कार्यकाळांमध्ये संरक्षण सामुग्री खरेदी करण्यासाठी केल्या गेलेल्या कोणत्याही सौद्यामध्ये सोनिया व राहुल गांधी यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, अशी ग्वाही अॅन्थनी यांनी सोमवारी दिली.काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना घेरण्यासाठी मोदी सरकार तपासी यंत्रणांना हाताशी धरून नवनवीन खोटेपणा शोधून काढत आहे, असा आरोप करून अॅन्थनी एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी संरक्षण सामुग्री खरेदीच्या कोणत्याही व्यवहारात कधीही स्वारस्य दाखविले नाही, असे माजी संरक्षणमंत्री या नात्याने मी नि:संदिग्धपणे सांगू शकतो.अॅन्थनी म्हणाले की, अगुस्ता वेस्टलॅण्डच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल इटलीमधून येताच, या मोदी सरकारने नव्हे तर मी ‘सीबीआय’ चौकशीचा आदेश दिला होता. हे प्रकरण इटलीच्या न्यायालयात लढण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला व शेवटी आम्ही तो खटला जिंकलोही.या गैरव्यवहाराची पाळेमुळे खणून काढल्याचा मोदी सरकारचा दावा धादांत खोटा आहे, असे सांगत अॅन्थनी असेही म्हणाले की, या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा आम्ही त्यावर तत्परतेने पावले उचलली.एवढेच नव्हे तर अमेरिका, रशिया व सिंगापूरच्या प्रत्येकी एका कंपनीसह संरक्षणसामुग्री पुरविणाऱ्या पाच-सहा प्रभावशाली कंपन्यांना आम्ही ‘काळ्या यादी’त टाकले. या प्रकरणात आम्ही केलेल्या कारवाईचा इतिहास कठोर पावले उचलण्याचा आहे. याउलट मोदी सरकार स्वत: नवे काही न करता श्रेय घेत आधीच्या सरकारला निष्कारण बदनाम करत आहे.
शहा यांनी गांधी कुटुंबियांना केले लक्ष्यनवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी श्रीमती गांधी यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, कथित दलाल मायकेल आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यात जुनी मैत्री आहे.शहा यांनी सवाल केला आहे की, सोनिया गांधी यांच्याबाबत मायकेलला विचारण्यात आलेले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत काय? अमित शहा यांनी टष्ट्वीट केले आहे की, मायकेलने श्रीमती गांधी यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा तपशील आपल्या वकिलांना का दिला?मायकेलसाठी वकिली करणाºया एल्जो के. जोसेफ ला युथ काँग्रेसमधून काढून टाकल्याबाबत शहा म्हणाले की, हे तर ढोंग आहे. ते मायकेल आणि श्रीमती गांधी यांच्यातील दुवा आहेत.