Sonia Gandhi: सोनिया गांधींना पुन्हा रुग्णालयात केले दाखल, जाणून घ्या तब्येतीचे अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 03:33 PM2023-03-03T15:33:10+5:302023-03-03T15:40:26+5:30
Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सोनिया गांधी यांच्यावर चेस्ट मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
२ मार्च रोजी सोनिया गांधी यांना ताप आल्याने त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, सोनिया गांधी अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
UPA chairperson Sonia Gandhi was admitted to Delhi's Sir Gangaram Hospital due to fever on 2nd March, says the hospital.
— ANI (@ANI) March 3, 2023
She is undergoing observation and investigations and her condition is stable: Dr DS Rana, Chairman, Sir Ganga Ram Hospital pic.twitter.com/qx7eimSPN6
कोरोनाच्या साथीपासून सोनिया गांधी (Sonia Gandhi health update) यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यानही सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यात्रा सोडून दिल्लीत पोहोचले. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
'पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, दूर्बिणीतूनही दिसणार नाहीत...', अमित शहांची खोचक टीका
राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. नुकतेच केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे वक्तव्य समोर आले असून त्यात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Sonia Gandhi health update)