ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २ - इशरत जहाँ चकमक प्रकरणावरुन पी चिदंबरम यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र पी चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. चिदंबरम यांनी अगोदरच स्पष्टीकरण दिलं असल्याचं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला सत्तेत असल्यापासून टार्गेट केले जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे. दरम्यान आज सकाळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेत्यांशी यासंबंधी चर्चा करुन दोन्ही सभागृहात चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं या महिला दहशतवाद्यासंदर्भात केंद्र सरकारने 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिली होती.