'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:14 PM2024-02-09T18:14:23+5:302024-02-09T18:15:44+5:30
Bharat Ratna: केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्याने मोठा दावा केला आहे.
Bharat Ratna Award: केंद्र सरकारने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एसएम स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते मधु गौर यास्की यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल एक मोठा दावा केला.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस नेते मधु गौर म्हणाले की, 'नरहिंस राव आपले राष्ट्रीय आयकॉन आहेत, ते आपल्या देशाचा अभिमान आहेत. सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण त्यांनी नरसिंह राव यांच्या बुद्धिमत्तेचा आणि काँग्रेससाठी त्यांच्या त्यागाचा आदर करत राव यांच्या नावाची शिफारस केली. देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला होता, तेव्हा त्यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या उंचावले आणि सुधारणा घडवून आणल्या.'
#WATCH | On Bharat Ratna being conferred on former Prime Ministers Chaudhary Charan Singh and PV Narasimha Rao, Congress leader Madhu Goud Yaskhi says, "...They are the national icons...they are the pride of the nation...Sonia Gandhi could have become the PM but she respected the… pic.twitter.com/uRv7bCnjmq
— ANI (@ANI) February 9, 2024
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्याबाबत म्हणाले की, 'आज आपण जो विकास पाहत आहोत, त्याचे श्रेय मनमोहन सिंग यांनाही जाते. त्यावेळी ते देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी सोबत मिळून या देशाची अर्थव्यवस्था उभारली. आता भाजप फक्त मजले चढवण्याचे आणि मोठमोठे दावे करण्याचे काम करत आहे,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.