सोनिया गांधी,प्रियांका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द; काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होणार होते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 01:33 PM2023-12-28T13:33:33+5:302023-12-28T13:37:23+5:30
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. काँग्रेसच्या मेळाव्याला दोन्ही नेते उपस्थित राहणार नाहीत.
आज, काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, खासदार सोनिया गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. या मेळाव्याला दोन्ही नेते उपस्थित राहणार नाहीत. आधी या दोन्ही नेत्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला.
भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडताच या पक्षाला पडलं मोठं खिंडार; बंडाचा आवाज 2024मध्ये घुमणार!
आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त त्या 'है तयार हम' या रॅलीने निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहेत. दुपारी ३ वाजल्यापासून उमरेड, नागपूर येथे बैठक सुरू होईल. या महासभेला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
या महासभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश नाना पटोल हे संबोधित करणार आहेत. काँग्रेसच्या या मेगा रॅलीमध्ये सुमारे १० लाख लोक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या महासभेला ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातून एक लाखाहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. या मेळाव्यात सार्वत्रिक निवडणुकीची थीम आणि मुद्दे जाहीर होण्याची शक्यता आहे. मेगा रॅलीनंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारींसोबत बैठक घेणार असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.