नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या 'भारतरत्न'वर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 02:32 PM2024-02-09T14:32:38+5:302024-02-09T14:33:20+5:30
Sonia Gandhi Reaction on Bharat Ratna: केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली आहे.
Sonia Gandhi Reaction on Bharat Ratna: केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या एमएस स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. यावर काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या निर्णयाचे स्वागत केले.
VIDEO | Here's what Congress leader Sonia Gandhi said on #BharatRatna for former prime ministers P V Narasimha Rao and Chaudhary Charan Singh as well as agriculture scientist M S Swaminathan.
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2024
"I welcome them. Why not," she said. pic.twitter.com/6nDlghHiTC
दरम्यान, नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना राष्ट्र उभारणीला गती देण्यासाठी भारतरत्न, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी आणि एमएस स्वामीनाथन यांना कृषी क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी भारतरत्न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले.
संबंधित बातमी- चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा ही आम्हीच मागणी केली होती - अखिलेश यादव
राजीव शुक्ला यांची बोचरी टीका
काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि स्वामिनाथन या सन्मानास पात्र आहेत, असे ते म्हणाले. तसेच, भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यात नरसिंह राव यांचे मोठे योगदान होतेच, पण मनमोहन सिंग त्यांच्या कार्यकाळात देशाचे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंग यांनी 2004-2014 काळात नरसिंह राव यांचे कार्य पुढे नेण्याचे काम केले. आता सरकार त्यांच्याविरोधात श्वेतपत्रिका आणत आहे, हे खेदजनक आहे. एकीकडे तुम्ही भारतरत्न देता आणि दुसरीकडे टीका करता, हे योग्य नाही, असंही शुक्ला म्हणाले.