'मणिपूर हिंसाचाराने देशाच्या आत्म्याला खोल जखम', सोनिया गांधींनी शांततेचे आवाहन करणारा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:57 PM2023-06-21T19:57:57+5:302023-06-21T19:58:30+5:30

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडीओ संदेश शेअर करून मणिपूरमध्ये शांततेचे आवाहन केले आहे.

sonia gandhi released video and appealed for peace manipur violence left deep wound conscience country | 'मणिपूर हिंसाचाराने देशाच्या आत्म्याला खोल जखम', सोनिया गांधींनी शांततेचे आवाहन करणारा व्हिडीओ केला शेअर

'मणिपूर हिंसाचाराने देशाच्या आत्म्याला खोल जखम', सोनिया गांधींनी शांततेचे आवाहन करणारा व्हिडीओ केला शेअर

googlenewsNext

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. याद्वारे त्यांनी मणिपूरच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमधील लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अभूतपूर्व हिंसाचाराने आपल्या देशाच्या विवेकावर खोल जखमा केल्या आहेत. लोकांना घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले हे पाहून मला खूप दुःख झाले.

PM Modi In USA: योग भारतातून आला, खूप जुनी परंपरा, पेटंट मुक्त, पंतप्रधान मोदी UN मध्ये म्हणाले...

सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जवळपास ५० दिवसांपासून आपण एक मोठी मानवी शोकांतिका पाहिली आहे. या हिंसाचारामुळे राज्यातील हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या हिंसाचारात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती मी शोक व्यक्त करतो. शांततेने जगणारे आपले बंधू-भगिनी एकमेकांच्या विरोधात जात आहेत हे पाहून मन हेलावते, असंही गांधी म्हणाल्या. 

सोनिया गांधी म्हणाल्या, मणिपूरचा इतिहास सर्व जाती, धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा आणि विविध समाजाच्या असंख्य शक्यतांचा साक्ष देतो. बंधुभावाची भावना जोपासण्यासाठी प्रचंड विश्वास आणि सद्भावना आवश्यक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. एक चुकीचे पाऊल द्वेष आणि विभाजनाची आग पेटवण्यासाठी पुरेसे आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, मी मणिपूरच्या लोकांना, विशेषत: माझ्या धाडसी भगिनींना या सुंदर भूमीत शांतता आणि सौहार्दाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करते. एक आई म्हणून मला तुमची वेदना समजते आणि तुम्ही योग्य मार्ग काढशीला अशी मला आशा आहे. मला आशा आहे की पुढच्या आठवडे आणि महिन्यांत आम्ही विश्वासाच्या पुनर्निर्माणाच्या दीर्घ प्रवासाला सुरुवात करू. मला मणिपूरच्या लोकांवर अपार आशा आणि विश्वास आहे आणि मला माहीत आहे की एकत्रितपणे आपण या परीक्षेवर मात करू, असंही गांधी म्हणाल्या. 

Web Title: sonia gandhi released video and appealed for peace manipur violence left deep wound conscience country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.