नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे, आम्हाला राजधर्म शिकवू नये, असा टोला प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षांना लगावला आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसेनंतर सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, सोनिया गांधी यांनी आरपारच्या गोष्टी करू नये. काँग्रेस पक्ष गुरुवारी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेला होता. आम्हाला राजधर्माविषयी सांगण्यात येत आहे. या राजधर्मावरून मला काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना काही सवाल विचारायचे आहे, असं प्रसाद म्हणाले.
हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले.
दरम्यान इंदिराजींनी युगांडाची मदत केली होती. राजीव गांधी यांनी तमिळ लोकांची मदत केली होती. तर मनमोहन सिंग यांनी नागरिकता मिळावी तसेच अशोक गेहलोत यांनी शिवराज पाटील आणि अडवाणी यांना पत्र लिहून नागरिकता मिळावी, अशी मागणी केली होती. एनपीआर काँग्रेस सरकारनेच सुरू केले आहे. तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं लोकांना भडकवणार का, असा प्रश्न त्यांनी सोनिया गांधी यांना विचारला.