Congress Chintan Shibir : "इथं मनमोकळेपणानं बोला, पण..."; चिंतन शिबिरात सोनिया गांधी कार्यकर्त्यांना स्पष्टच बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:01 PM2022-05-13T17:01:57+5:302022-05-13T17:23:36+5:30

मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. 

sonia gandhi speech in Congress chintan shibir at Rajasthan | Congress Chintan Shibir : "इथं मनमोकळेपणानं बोला, पण..."; चिंतन शिबिरात सोनिया गांधी कार्यकर्त्यांना स्पष्टच बोलल्या!

Congress Chintan Shibir : "इथं मनमोकळेपणानं बोला, पण..."; चिंतन शिबिरात सोनिया गांधी कार्यकर्त्यांना स्पष्टच बोलल्या!

googlenewsNext

आपण येथे मनमोकळेपणाने आपले मत मांडण्यासाठी स्वतंत्र आहात. पण, संघटन एक आहे, हाच संदेश बाहेर जायला हवा. काँग्रेस पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. पण, आता पक्षाचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस अधक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्या आज राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

सोनिया म्हणाल्या, आपण जेव्हा येथून बाहेर पडाल, तेव्हा नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन बाहेर पडा. देसातील जनतेला काँग्रेसकडून मोठ्या आशा आहेत. आपल्याला त्यांच्या आशा पूर्ण करून दाखवाव्या लागतील. मोदी सरकारच्या राज्यात देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि नोटाबंदीपासून ही घसरण सातत्याने सुरूच आहे. एवढेच नाही, तर आता आपल्याला नोकऱ्या मिळणार नाहीत, हे लोकांनी गृहित धरले आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे. 
 
Web Title: sonia gandhi speech in Congress chintan shibir at Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.