शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सोनिया गांधी राजस्थानातून आज भरणार उमेदवारी अर्ज; कारकिर्दीत प्रथमच राज्यसभेत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 06:03 IST

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

आदेश रावलनवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी बुधवारी राज्यसभेसाठी राजस्थानमधून  अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील. यामुळे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा एक दिवस थांबविणार आहेत. 

सोनिया गांधी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार करावे, अशी पक्षांतर्गत चर्चा आतापर्यंत होती. परंतु, तेथे काँग्रेस आमदारांची संख्या जास्त नाही. त्यामुळे ७० आमदार असलेल्या राजस्थानमधून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार समोर आला.  त्या विजयी झाल्यास प्रथमच राज्यसभेच्या सदस्या बनणार आहेत. 

प्रियांका गांधी रायबरेलीतून लढणार?काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी २००४पासून येथून निवडणूक लढवत आहेत. रायबरेली ही जागा काँग्रेसची सुरक्षित जागा मानली जाते. १९५२पासून काँग्रेसचा येथे फक्त तीन वेळा पराभव झाला.

राज्यस्थानातूनच का? कर्नाटक आणि तेलंगणा काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी यापूर्वीच सोनिया गांधी यांना त्यांच्या राज्यातून राज्यसभा सदस्य बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, पक्षाच्या रणनीतीकारांनी असा तर्क मांडला की, राहुल गांधी हे केरळमधून खासदार आहेत. सोनिया गांधीही दक्षिण भारतातून राज्यसभेच्या सदस्य झाल्या तर काँग्रेसला फक्त दक्षिण भारताचा पक्ष संबोधले जाईल. अशा स्थितीत सोनिया गांधी यांना उत्तर भारतातून राज्यसभेत पाठवले पाहिजे. त्यामुळे त्यांना राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार केले जात आहे.

आपचे उमेदवार जाहीरराहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये गुंतलेल्या काँग्रेसला कंटाळून मंगळवारी आपने दक्षिण गोवा तसेच गुजरातमधील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा