सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:49 AM2019-06-13T06:49:01+5:302019-06-13T06:49:29+5:30
रायबरेलीचा दौरा; काँग्रेसचा लढा सुरूच राहणार, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
रायबरेली : उत्तर प्रदेशात भाजपने काँग्रेसचा सणसणीत पराभव केला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये पराभूत झाले; पण रायबरेलीतून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या. या विजयाबद्दल सोनिया गांधी यांनी बुधवारी रायबरेलीला भेट देऊन मतदारांचे आभार मानले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही होत्या.
रायबरेलीपासून अमेठी जवळ असूनही सोनिया व प्रियांका गांधी या तिथे जाण्याची शक्यता नाही. सोनिया व प्रियांका गांधी यांचे बुधवारी सकाळी विमानाने फुरसतगंज येथे आगमन झाले. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियांका गांधी यांनी रायबरेली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. लोकसभा निवडणुकांत रायबरेली जिल्ह्यात काँग्रेसने केलेल्या कामगिरीबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.
रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी आयोजिलेल्या कार्यक्रमाला सुमारे अडीच हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांत रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी व भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा १ लाख ६७ हजार १७८ मतांनी पराभव केला होता.
पोटनिवडणुकांची तयारी सुरू
च्धर्मनिरपेक्षता, तसेच अन्य महत्त्वाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. वेळप्रसंगी त्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
च्प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्या तेथील ३५ मतदारसंघांत फिरून पराभवाविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे समजून घेणार आहेत.
च्उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची त्या तयारी करीत आहेत.