नवी दिल्ली : २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ‘कोएलिशन इअर्स : १९९६ - २०१२’च्या तिस-या खंडात नमूद केले आहे. बाळासाहेबांनी मुखर्जी तेव्हा मुखर्जीना पाठिंबा दिला होता.प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, मी बाळासाहेबांची भेट न घेतल्यास ते त्याला अपमान समजतील, असे मला शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे सोनिया यांची नापसंती माहीत असूनही बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यास गेलो. ज्या व्यक्तीने आपल्या रालोआमध्ये असूनही मला पाठिंबा दिला, त्याचा अपमान होऊ नये, असे मला मनापासून वाटले होते.मी पवारांना विनंती केली की, त्यांनी मला विमानतळावरुन ठाकरे यांच्या घरी घेऊन जावे. पवार त्यासाठी तयारही झाले. ही भेट अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होती. आपल्या खास शैलीत बाळासाहेब म्हणाले होते की, रॉयल बंगाल टायगरला मराठा टायगरने पाठिंबा देणे स्वाभाविक आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मी एक सांप्रदायिक दृष्टिकोनाचा नेता म्हणून ओळखत होतो. पण, त्यांचा पाठिंबाही विसरणे मला शक्य नव्हते.पवार हे यूपीए - २ चे सहयोगी होते. मी बाळासाहेबांची भेट घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता, असे सांगत आपण घेतलेली भेट योग्यच होती, असा दावाही मुखर्जी यांनी या पुस्तकात केला आहे. आपल्या १३ जुलै २०१२ च्या मुंबई दौ-याचा उल्लेख करून मुखर्जी लिहितात की, सोनिया गांधी व पवार या दोघांना मी विचारले होते की, बाळासाहेबांची भेट मी घ्यावी का? सोनिया गांधी या भेटीच्या बाजूने नव्हत्या. शक्यतो ही भेट मी टाळावी, असे त्यांना वाटत होते. बाळासाहेबांविषयीचे सोनिया यांचे मत त्यांच्या राजकीय विचार व धोरणांवर आधारित होते.शिवसेनेने २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना यांना पाठिंबा देण्याचे कारण समजण्यासारखे होते. प्रतिभाताई महाराष्ट्रातीलच होत्या. पण ठाकरे यांनी माझ्या बाबतीत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानने माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते.मी दिल्लीला परतल्यावर गिरिजा व्यास मला भेटल्या आणि म्हणाल्या की, ठाकरे यांच्या भेटीमुळे सोनिया गांधी व अहमद पटेल नाराज आहेत. मी त्यांच्या नाराजीचे कारण समजू शकतो. पण, मला असे वाटते की, मी जे काही केले ते योग्य होते.
बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:24 AM