ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 9 - समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पक्षांनी विरोधकांना कडवी झुंज देण्याचा दावा केला आहे. आमचंच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यामुळे प्रचारात स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी 20 फेब्रुवारीला रायबरेलीत प्रचारसभा घेणार आहेत. सोनिया गांधीची ही एकमेव प्रचारसभा असेल. सपाशी हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेसला 105 जागा मिळाल्या असून यामध्ये अमेठी आणि रायबरेलीतील जास्त जागा आहेत. काही जागांवरील वाद अद्याप कायम आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रियांका गांधी 14 फेब्रुवारीला रायबरेली आणि अमेठीतून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 14 आणि 15 फेब्रुवारीला प्रियांका गांधी रायबरेलीत प्रचार करतील. त्यानंतर 16 ते 18 फेब्रुवारीपर्यंत अमेठीत प्रचार सुरु असेल. राहुल गांधी 18 फेब्रुवारीला रायबरेलीत प्रचारसभा घेतील.