शीलेश शर्मा नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी काँग्रेसला सोबत न घेता विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याची मोहीम हाणून पाडण्यास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पुढाकार घेतला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे खासदार टी. आर. बालू, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी विरोधी सरकारांच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधत आहेत.सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) नव्याने बळकट करून भाजपविरोधात सामूहिक संघर्ष करण्याची रणनीतीची सूचना केली.सोनिया गांधी काही दिवसात लालू प्रसाद यादव, डी. राजा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्याशी चर्चा करतील. अखिलेश यादव यांच्याशी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक झाल्यावरच चर्चा होण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जींच्या मोहिमेला सोनिया गांधी रोखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 10:49 AM