- हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू व्हायच्या आधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या उपाययोजना करतील, अशी आशा ते पत्र लिहिलेल्या २३ असंतुष्ट नेत्यांना आहे. हा गट जिंजर ग्रुप २३ नावाने आता ओळखला जातो. संघटनात्मक निवडणुका या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होतील तोपर्यंत राजकीय निर्णय घेण्यासाठी राजकीय कामकाज समिती (पीएसी) स्थापन केली जाऊ शकते, अशी जी-२३ ची अपेक्षाआहे.काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही म्हटलेले आहे. काही वेळ वाट बघायला आम्हाला आवडेल.’काँग्रेस पक्षात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या त्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांत सिब्बल यांचाही समावेश आहे. सिब्बल यांनी आशा व्यक्त केली की, ‘सोनिया गांधी या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जाईपर्यंत राजकीय कामकाजासाठी पीएसी किंवा कोअर समिती तयार करतील.’गुलाम नबी आझाद, शशी थरूर आणि कपिल सिब्बल या नेत्यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘आम्ही पत्रात उपस्थित केलेली चिंता पक्षाने दूर केली पाहिजे,’ असे आवाहन केले होते. थरूर तर एवढेही म्हणाले की, ‘नेतृत्वासमोर आम्ही आमची भूमिका मांडल्यामुळे आता चर्चेला पूर्णविराम द्यावा.’कोअर समिती स्थापन होईल अशी आशाअसंतुष्ट नेत्यांमधील या वरिष्ठ नेत्यांना यादरम्यानच्या काळात परिणामकारक ठरेल अशी कोअर समिती सोनिया गांधी स्थापन करतील, अशी आशा आहे. सोनिया गांधी यांनी लोकसभा आणि राज्यसभा समन्वयासाठी दोन समित्यांची स्थापना केली आहे; परंतु पक्ष संघटनेचे दररोजचे कामकाज चालवण्यासाठी परिणामकारक असे काही उपलब्ध नाही.सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकत नाही व त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा प्रत्यक्ष अशी रोजच्या रोज बैठकही घेत नाहीत. राहुल गांधी यांनी स्वत:च्या टष्ट्वीटस्द्वारे एक कार्यक्रम समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सरचिटणीस एकमेकांना भेटत नाहीत. पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरू व्हायच्या आधी जी-२३ भेटेल.
अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी तोडगा काढतील, जी-२३ मधील वरिष्ठ नेत्यांना आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 3:59 AM