सोनिया गांधी 'अशी' चूक करणार नाहीत; काॅंग्रेसमधील बंडखाेरांकडे ‘हायकमांड’चे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:39 AM2021-10-06T06:39:10+5:302021-10-06T06:39:40+5:30
गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बाेलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, साेनिया गांधींकडून ती मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काॅंग्रेसच्या पक्षनेतृत्वाबाबत विराेधी भूमिका घेणाऱ्या तथाकथित बंडखाेराची पक्षश्रेष्ठींकडून फारसी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ज्या पद्धतीने गच्छंती झाली, त्यानंतर विराेधक आता सारवासारव करताना दिसत आहेत. हरियाणातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा हे साेनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या ‘जी-२३’ नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, त्यांचे पुत्र राज्यसभा सदस्य दिपेंदरसिंग हुडा हे खंबीरपणे गांधी कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांच्यासारखे नेते सध्या माैन बाळगून आहेत.
काय आहे मागणी...
गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बाेलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, साेनिया गांधींकडून ती मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे. काॅंग्रेसच्या सूत्रांनी ‘लाेकमत’ला सांगितले, की साेनिया गांधी अशी चूक करणार नाही. तत्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांनी १९९८मध्ये तशी चूक केली हाेती. तसेच व्हर्च्युअल बैठकीत सर्व सूत्रे ‘हायकमांड’च्या हाती असतात. त्यांच्या परवानगीनंतरच इतरांना बाेलता येते.