सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:41 PM2024-01-04T21:41:30+5:302024-01-04T21:42:39+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

Sonia Gandhi: Will Sonia Gandhi leave RaeBareli constituency? Proposal to contest election in 'this' state | सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) रायबरेलीतून (Raebareli) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झालीये. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव तेलंगणा काँग्रेसने मांडला आहे. तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील याच जागेवरून निवडणूक लढवली होती. आता सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले आहे. 

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्ला
सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली हा जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता, ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आली. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

रायबरेलीतून कोण लढणार?
सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पण, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डाव्यांनी वायनाड जागेवर दावा केला आहे. पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

Web Title: Sonia Gandhi: Will Sonia Gandhi leave RaeBareli constituency? Proposal to contest election in 'this' state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.