शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

ब्लॅक फंगसच्या औषधांचा साठा उपलब्ध करा; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 3:51 PM

Sonia Gandhi : ब्लॅक फंगसचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्दे'Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे.'

नवी दिल्ली : देशात ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजाराच्या औषध तुटवड्यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. (Congress interim chief Sonia Gandhi wrote to PM Modi requesting to take action on acute scarcity of Liposomal Amphotericin-B in the market)

केंद्र सरकारने केवळ राज्यांना ब्लॅक फंगसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.

याचबरोबर, ब्लॅक फंगसचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. त्यामुळे हे औषध मिळण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यात यावी. तसेच, हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे ब्लॅक फंगस या आजाराचा समावेश आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये करावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदींना केली आहे.

(सोनिया गांधींचं मोदींना भावनिक पत्र, 'त्या' मुलांच्या मदतीसाठी केली विनंती)

दरम्यान, कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती. यामध्ये कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत. त्यामुळे या पीडित मुलांसोबत घडलेल्या अकल्पनीय दु:खामुळे आपण राष्ट्र म्हणून त्यांच्या पाठिशी उभा राहायला हवे, त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा, असे भावनिक पत्र सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना लिहिले होते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMucormycosisम्युकोरमायकोसिस