नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य दोघांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी बजावण्यात आलेला समन्स रद्द करण्याला ७ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला होता. सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यासह याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने समन्स रद्द करण्याला नकार देतानाच या सर्वांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा ताबा कसा घेतला, अशी विचारणा करीत वर्तणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
सोनिया गांधी यांची सुप्रीम कोर्टात धाव
By admin | Published: February 05, 2016 3:07 AM