सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:00 AM2020-07-20T10:00:06+5:302020-07-20T11:38:05+5:30
असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे.
जयपूर - सचिन पायटल यांच्या बंडखोरीमुळे राजस्थानमध्ये सुरू झालेली राजकीय लढाई सध्या कायद्याच्या चौकटीत पोहोचली आहे. युवा पायलट आणि अनुभवी गहलोत यांच्यात वर्चस्व आणि सत्तासंघर्षावरून सुरू झालेल्या चढाओढीतील पहिल्या टप्प्यात अशोक गहलोत सचिन पायलट यांना वरचढ ठरले आहेत. आता पायटल गट न्यायालयात पोहोचला असला तरी राजस्थानमधील सत्ता राखण्याबाबत आता काँग्रेस निश्चिंत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे.
सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडून मिळालेल्या अपात्रतेच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र या न्यायालयीन लढाईतही गहलोत गट निश्चिंत आहे. तसेच न्यायालयीन लढाईत पायलट गटाने बाजी मारली तरी त्यांची कोंडी करण्याची योजना गहलोत आणि काँग्रेसने तयार केली आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात बाजी मारली तरी त्यांनी काँग्रेससोबत यावे लागेल, किंवा विधानसभा सदस्यत्वावर पाणी सोडावे लागेल.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्या गटाविरोधात असे चक्रव्युह रचले आहे ज्यातून बाहेर पडणे पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कठीण जाणार आहे. राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस नेतृत्व वेळीच सक्रीय झाले होते. त्यांनी सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवतानाच संपूर्ण पक्ष संघटनेतच मोठे फेरबदल केले. सचिन पायटल यांनी सात वर्षांच्या काळात पक्षसंघटनेमध्ये जेवढ्या लोकांना स्थान दिले होते तेवढ्यांना एका फटक्यात दूर करण्यात आले. पायलट यांच्याविरोधात सोनिया गांधींची ही पहिली चाल होती.
आता सचिन पायटल आणि त्यांच्या गटाला दुसरा धक्का देण्याची रणनीतीसुद्धा तयार झाली आहे. त्यानुसार आता हायकोर्टाचा निर्णय पायलट गटाच्या बाजूने गेल्यास सभागृहात बहुमत परीक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून पु्न्हा व्हिप जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. हा व्हिप बजावण्यात आल्यानंतर पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी व्हिपचे पालन करावेच लागेल, अन्यथा त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया अजून सोपी होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी