रायबरेली/नवी दिल्ली : जातीय तणावाच्या वाढत्या घटना आणि भाववाढीच्या मुद्यावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. रालोआ सरकारच्या 1क्क् दिवसांच्या कामगिरीचा काँग्रेसच्यावतीने आढावा घेत, त्यांनी रायबरेली येथील दौ:यात मोदी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह लावले.
जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले की नाही, याचे उत्तर जनताच देईल, असे त्या रायबरेली येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. मोदी सरकारच्या 1क्क् दिवसांच्या काळात जातीय तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत मौन पाळत आहेत. तेच भाजपला जातीय कारवायांसाठी प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. सरकारच्या कृती आणि उक्तीत सातत्याने तफावत असल्याचे गेल्या 1क्क् दिवसांत आढळून आल्याचे अन्य प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी स्पष्ट केले.
लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी आपले वक्तृत्व कौशल्य दाखविताना जातीय सलोखा आणि शांतता यासारखे गोंडस शब्द वापरले आहेत. अशोक सिंघल (विहिंप), मोहन भागवत (सरसंघचालक), आदित्यनाथ (भाजपचे प्रदेशाध्यक्ष), गिरिराजसिंग (बिहारमधील भाजपचे खासदार) यांनी केलेल्या चिथावणीजनक विधानांवरही मोदींनी मौन पाळल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा वापर..
शिक्षकदिनी मोदींनी विद्याथ्र्याशी संवाद साधण्याच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवत प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपण त्यांना त्यासाठी मुभा देणार काय? हा स्वत:च्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणोचा गैरवापर ठरतो. पहिल्या वर्गातील विद्याथ्र्याने उभे राहावे, बसावे आणि
भाषण ऐकावे, हा हुकूम पंतप्रधान किंवा राष्ट्रपती देऊ शकतात का? त्यांनी केजीच्या मुलांना सोडल्याबद्दल देवाचे आभार मानतो, असा टोलाही सिंघवी यांनी लगावला.