विरोधकांच्या ऐक्यासाठी सोनियांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:40 AM2018-03-07T01:40:20+5:302018-03-07T01:40:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना १३ मार्च रोजी रात्री भोजनासाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेस अधिवेशनाआधी हे भोजन होणार आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना १३ मार्च रोजी रात्री भोजनासाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेस अधिवेशनाआधी हे भोजन होणार आहे.
आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) असलेल्या पक्षांनाही त्याचे निमंत्रन देण्यात आले आहे. त्यात तेलगू देसम पक्ष (टीडीपी) व तेलंगण राष्ट्र समितीचा (टीएसआर) समावेश आहे. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुका पाहता सोनिया गांधी यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
या बैठकीत मोदी सरकारविरोधात संसदेत व बाहेर भूमिका घेण्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. टीडीपीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जंतरमंतरला गेले व त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. काँग्रेसला सत्ता मिळाली तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे या भोजनाला टीडीपी नेते जातील, असे दिसते.
तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही तिथे यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी बॅनर्जी यांच्याशी स्वत: सोनिया संपर्क साधू शकतील.