बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रसिद्ध 'व्हिलन' सोनू सूद (Actor Sonu sood) कोरोना लॉकडाऊनपासून कमालीचा गाजत आहे. सोनू सूदने कोरोना काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. लोकांनी त्याला अनेकदा ट्विटर अकाऊंटवर मदतीची साद घातली आहे. काही खोडकर ट्विटना त्याच खोडकर भाषेत उत्तर देणे, गरजुंना खरोखरची मदत पोहोचविणे यामुळे सोनू सध्या आघाडीवर आहे. मात्र, त्याच्या याच प्रसिद्धाचा काही समाजकंटकांनी गैरवापर केला आहे.
सोनू सूदच्या नावे ट्विटरवर फेक अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. या अकाऊंटद्वारे लोकांचे मोबाईल नंबरही विचारले जात आहेत. याबाबत जेव्हा सोनी सूदला समजले तेव्हा त्याने या लोकांना इशारा देत हे धंदे बंद करण्याची विनंती केली आहे. सोनूने त्याच्या खऱ्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, भोळ्या लोकांना फसविण्याच्या गुन्ह्याखाली तुम्ही लवकरच गजाआड होणार आहात. तत्पूर्वी खूप उशिर होण्याआधी सुधरा, असा इशारा दिला आहे. सोनू सूदच्या नावे याधीही काही फेक आकाऊंट तयार करण्यात आली होती. मात्र, तेव्हा सोनू सूदने कोणतीही अॅक्शन घेतली नव्हती. आता लोकांची होणारी फसवणूक पाहून सोनूने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
अद्याप सोनू सूदने या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांत नोंदविलेली नसून केवळ या समाजकंटकांना इशारा दिला आहे. जर सोनूच्या नावावर सुरु असलेली फसवणूक बंद झाली नाही तर कदाचित सोनू कायदेशीर कारवाई करू शकतो.
दिवसाला सोनूकडे मागितली जाणारी मदतलॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सुपरहिरो ठरलेला सोनू सूद अजूनही लोकांची भरभरून मदत करत आहे. मजुरांच्या मदतीपासून सुरू झालेल्या त्याच्या या प्रवासाने आता व्यापक रूप घेतलं आहे. सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे.
सोनूला रोज मदतीसाठी कितीतरी लोक वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतात. पण रोज नेमके किती लोक त्याच्याकडे मदत मागतात याचा खुलासा आतापर्यंत करण्यात आला नव्हता. आता याची नेमकी आकडेवारी सोनूने ट्विटरवर शेअर केली आहे. एक दिवशी मदत मागणाऱ्यांची आकडेवारी पाहून लोक अवाक् झाले आहेत.
सोनूने लिहिले की, '११३७ मेल, १९००० फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टा मेसेज आणि ६७४१ ट्विटर मेसेज. हे आजचे मदतीचे मेसेज. सरासरी आकडेवारी पाहिली तर साधारण रोज इतके मदतीचे मेसेज येतात. एक माणूस म्हणून या सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो'.
सोनूने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, 'जर माझ्याकडून तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा'. दरम्यान सोनूने लॉकडाऊनपासून हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं आहे. त्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळी मदत लोकंनी मागितली. अनेकांना त्याने पुस्तके दिली, अनेकांची फि भरली. आता तो अनेकांना रोजगार देतो आहे. त्यासाठी त्याने एक अॅपही सुरू केलं आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य
वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द
Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड
युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप
किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी
भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या
'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्
कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव