शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ठरणार का दूत, पुढाकार घेतोय सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 9:12 PM

मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली. 

ठळक मुद्दे मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली. 

मुंबई - बॉलिवूडमध्येसोनू सूद आपल्या सिनेमांसोबतच दिलदारपणामुळेही ओळखला जातो. सध्या सोनू मोकळ्या हाताने वेगवेगळ्या लाोकांची करतो आहे. ज्याचा परिणाम असा झाला की,  संपूर्ण देशात सोनू सूदची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. देशभरातून त्याची कामाची वाहवा होत आहे. लोकांकडून होणाऱ्या कौतुकामुळे आणि मदतीनंतर मिळणाऱ्या समाधानामुळे प्रॉब्लेम का सोल्यूशन म्हणजे सोनू सूद अशीच काहींची धारणा बनली आहे. सोनू सूदने मजूरांसाठी रोजगार देण्याचं काम हाती घेतलं असतानाच आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे.   

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत केली होती. अजूनही अडचणींमध्ये अडकलेल्या लोकांना तो मदत करत आहे. सोनू सूद हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अनेकजण सोनूला ट्वीटर वर टॅग करत मदत मागितल्याची उदाहरणे आहेत. मात्र काहीजण सोनूकडे इतर वैयक्तिक मदतही मागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत त्याने केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूरांना घरी पोहोचवण्यापासून त्याने ही सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक विद्यार्थी, गरीब लोकांची मदत केली. परदेशातूनही अनेकांना त्याने भारतात परत आणलं. त्याच्या कामाने प्रभावित होऊन आंध्र प्रदेशातील दोन गावात चक्क गावकऱ्यांनीच रोड तयार केला. 

देशातील जेईई परीक्षाला सुरुवात झाली आहे, पण सोनू सूदने कोरोनाची देशातील परिस्थिती आणि पूरस्थितीचा संदर्भ देत सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मी स्वत: इंजिनिअर असल्याचे सांगत सोनूने परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता, शिक्षण क्षेत्रात आपण क्रांतीकारी पाऊल टाकणार असल्याचं सोनू जाहीर केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनूने याबाबत माहिती दिली. 

लवकरच शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा करणार असल्याचं सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासाठी सोनू नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणSonu Soodसोनू सूदTwitterट्विटर