मोबाईल चोर निघाले सोनसाखळी चोर
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
जळगाव : ओंकारेश्वर मंदिर परिसरातून शनिवारी रात्री महिलांचे मोबाईल हिसकावून पळ काढल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेले रामेश्वर शेजमल राठोड (वय २२ ), ईश्वर संतोष चौधरी (वय २२) व स्वामी प्रीतम पाटील (सर्व रा.जामनेर) या तिघांना दोन महिन्यांपूर्वी वाघनगरातून सोनसाखळी चोरल्याचे चौकशीत समोर आले आहे. ही सोनसाखळी कुठे विकली व पैशांचे काय केले याची माहितीही त्यांनी दिली.
जळगाव : ओंकारेश्वर मंदिर परिसरातून शनिवारी रात्री महिलांचे मोबाईल हिसकावून पळ काढल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेले रामेश्वर शेजमल राठोड (वय २२ ), ईश्वर संतोष चौधरी (वय २२) व स्वामी प्रीतम पाटील (सर्व रा.जामनेर) या तिघांना दोन महिन्यांपूर्वी वाघनगरातून सोनसाखळी चोरल्याचे चौकशीत समोर आले आहे. ही सोनसाखळी कुठे विकली व पैशांचे काय केले याची माहितीही त्यांनी दिली. या तिघांनी शनिवारी रात्री महिलांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला होता. पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शामराव पवार, गुन्हे शोध पथकाचे महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी व शरद पाटील आदींचे एक पथक सोमवारी या तिघांना जामनेर येथे घेऊन गेले. तेथे त्यांनी गत काळात केलेल्या कारनाम्यांची माहिती दिली. चौधरी हा स्वत:ला बजरंग दलाचा पदाधिकारी सांगतो. तर स्वामी पाटील हा जामनेर येथील मुख्याधिकारी यांचा चालक असल्याची बतावणी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.