नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर त्रिपुरा सरकारने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाशासित त्रिपुरा सरकारने क्रिकेटच्या दादांवर पर्यटनाच्या ब्रँड ॲम्बेसेडरची जबाबदारी सोपवली असून गांगुली यांनी याचा स्वीकार केला आहे. मुख्यमंत्री मानिक साहा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
मुख्यमंत्री मानिक साहा यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड ॲम्बेसेडर होण्याचा आमचा प्रस्ताव स्वीकारला ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. मला खात्री आहे की श्री गांगुलीजींच्या सहभागाने राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नक्कीच गती मिळेल."
"...पण हे चाहत्यांना माहित नाही", फायनलमध्ये पोहचताच जड्डूनं ट्रोलर्सची केली बोलती बंद
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्रिपुरा राज्याचे पर्यटनमंत्री सुशांता चौधरी यांनी म्हटले, "आमच्या त्रिपुरा राज्यातील पर्यटनाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी मोठ्या ब्रँडिंगची आवश्यकता होती, ज्यासाठी आम्हाला एका लोकप्रिय ब्रँड ॲम्बेसेडरची गरज आहे, ज्याला संपूर्ण जग ओळखत असेल. जगात त्रिपुराच्या पर्यटनाचा डंका पोहचवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दादा सौरव गांगुली यांच्याहून अधिक लोकप्रिय व्यक्ती ती कोण असू शकते."