नवी दिल्ली : लोकसभानिवडणूक २०२४ मध्ये ‘मिशन ३७०’चे लक्ष्य घेऊन चालणाऱ्या भाजपने निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर करून इतर पक्षांवर दबाव टाकण्यात यश मिळविले आहे. पण ३७० जागा जिंकण्याची योजना पक्षाला पूर्ण करता येणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. विशेषत: गेल्या निवडणुकीत पक्षाला दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये खातेही उघडता आले नव्हते. दक्षिणेतील विजयाशिवाय भाजपला ३७० चे लक्ष्य गाठणे सोपे नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
उत्तर, पश्चिम राज्यांमध्ये भाजप सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ आहे आणि तेथे जागा वाढण्यास फारसा वाव नाही. त्यामुळे ३७०साठी दक्षिण भारतात मुसंडी मारण्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही.
कर्नाटक : जागा वाचवणे गरजेचे- दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकात गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती.- मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्ता गमवावी लागली.- यावेळी लोकसभा निवडणुकीत जनता दल (एस) सोबत आघाडी करून मागील यशाची पुनरावृत्ती करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
मोदींचे १० दौरे- केरळ : ३, १७ जानेवारी, २७ फेब्रुवारी- तामिळनाडू ३, २१ जानेवारी, २७ फेब्रुवारी, ४ मार्च- कर्नाटक २० जानेवारी- आंध्र प्रदेश १६ जानेवारी- तेलंगणा ०४ मार्च- राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मोदींनी दक्षिणेतील मंदिरांमध्ये दर्शन घेतले.
तामिळनाडू : छोट्या पक्षांकडून आशाएनडीएपासून अण्णाद्रमुक दूर गेल्यानंतर भाजपने जी. के. वासन यांच्या पक्षाला सोबत घेतले आहे.
केरळ : चर्चच्या मदतीची आस काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे वर्चस्व असलेला केरळ हा भाजपसाठी कमकुवत दुवा ठरला आहे. यावेळी ख्रिश्चन मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी पक्ष चर्चची मदत घेत आहे.
भाजपची मदार कशावर? - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव - आरएसएसचे काम - विविध पक्षांशी युती