बंगळुरु : कर्नाटकमधील जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला.
जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपाचे जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी 54457 मते मिळविली. तर, भाजपाच्या बी. एन. प्रल्हाद यांना 51568 मते मिळाली. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे. जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 11 जूनला मतदान घेण्यात आले होते. यावेळी 55 टक्के मतदान झाले होते.
गेल्या महिन्यात 12 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी. एन. विजय कुमार यांचे निधन झाले. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, या पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.