अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला कोणी बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मशिदीच्या पायाभरणीच्या विधानावरून विरोधकांनी योगींवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.
समाजवादी पक्षाने योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते पवन पांडेय यांनी ''या प्रकारचं विधान करून योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदासाठी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे. ते फक्त हिंदूंचे नाही तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात हिंदू आणि मुस्लिमांची जेवढीही लोकसंख्या असेल तेवढ्या लोकसंख्येचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे'' असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे माध्यम संयोजक लल्लन कुमार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. 'योगी आदित्यनाथ यांनी मशिदीच्या केलेल्या विधानावर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. राजीव गांधी हे अयोध्येला गेले होते आणि त्यांनी राम मंदिराचं टाळं उघडलं हे मुख्यमंत्र्यांना माहीत हवं. ते हिंदुत्वाचं राजकारण करत आहेत आणि काँग्रेस कायम लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. मात्र ते फक्त भाजपाचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत आहे आणि तो त्यांचा गैरसमज आहे' असं लल्लन कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर
"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"
'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान