शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

सपा-काँग्रेस एकत्र!

By admin | Published: January 23, 2017 3:42 AM

समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची अखेर उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम व काँग्रेसचे

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीसमाजवादी पार्टी आणि काँग्रेसची अखेर उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली. आघाडीच्या जागा वाटपात कोण किती जागा लढणार, याचे अधिकृत आकडे पत्रपरिषदेत जाहीर करण्यात आले नाहीत मात्र काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या ४0३ जागांपैकी २९८ जागा अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला १0५ जागा आल्या आहेत. समाजवादी आणि काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटपावरून बरीच ओढाताण सुरू होती. काँग्रेसची मागणी १२0 जागांची होती तर  अखिलेश यादव १00 पेक्षा अधिक  जागा देण्यास तयार नव्हते. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या काही जागांवरही समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केल्यामुळे तणाव आणखी वाढला होता. जागा वाटपाची कोंडी दूर होण्याची शक्यता दिसत नसल्याने, राष्ट्रीय पक्षाची आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारीही चालवली होती.‘सायकली’वरून असे बदलत गेले जागांचे गणित काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत अखिलेश यादवांना सायकल हे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते, तोपर्यंत काँग्रेसला १४२ जागा देण्याची तयारी अखिलेशनी दाखवली होती. निवडणूक आयोगाने सायकल चिन्हासह समाजवादी पक्षाची सूत्रे अखिलेशच्या हाती सोपवल्यानंतर मात्र आपल्या अडचणी कथन करीत अखिलेश यादवांनी काँग्रेसला १२१ जागा देऊ केल्या. काँग्रेसने या आॅफरलाही होकार दिल्यानंतर अखिलेश यादव यांनी मुलायमसिंगांच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे आहे, असे कारण पुढे करीत काँग्रेसला जास्तीत जास्त १00 जागा देण्याची तयारी दर्शवली.तेव्हा केवळ आघाडी तुटू नये म्हणून अखिलेशची विनंती काहीशा नाखुशीनेच मान्य करीत काँग्रेसने ११0 जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले मात्र तरीही तिढा संपत नव्हता.