शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

सपाची भाजपा आणि काँग्रेसवर टीका

By admin | Published: July 14, 2016 3:23 AM

उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून समाजवादी पार्टीने भाजपा आणि काँग्रेसवर बुधवारी सडकून टीका केली. भाजपाने मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा

लखनौ : उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून समाजवादी पार्टीने भाजपा आणि काँग्रेसवर बुधवारी सडकून टीका केली. भाजपाने मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी सुरेश राणा, तर काँग्रेसने द्वेषमूलक भाषण करणाऱ्या इम्रान मसूद यांना पदे दिली असून, निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतील निराशा वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे सपाने म्हटले आहे. भाजपाने मंगळवारी १५ उपाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात वादग्रस्त आमदार राणा यांचाही समावेश आहे. २०१३च्या मुझफ्फरनगर दंगलीत जमावाला चिथावल्याबद्दल त्यांना रासुका लावून तुरुंगात पाठविण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मसूद यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध द्वेषमूलक भाषण केले होते. काँग्रेसने त्यांची पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मसूद यांनी आपण मोदींचे तुकडे तुकडे करू, असे म्हटले होते. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना सुरेश राणा आणि इम्रान मसूद यांच्या निवडीबाबत छेडले असता, ते म्हणाले की, ‘या मागे राज्यातील वातावरण बिघडविण्याच्या मोठा कट आहे. मात्र, मतदारांना वस्तुस्थिती ठाऊक असून, ते जोरदार प्रत्युत्तर देतील.’ (वृत्तसंस्था)