शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

Pushpraj Jain IT Raid: सपा आमदार पुष्पराज जैन आयकर विभागाच्या ताब्यात; अद्याप धाडसत्र सुरूच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 1:27 PM

Pushpraj Jain IT Raid : सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी आणि पुष्पराज जैन यांच्या घरी पोहोचले. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना सोबत घेऊन जाताना दिसले.

कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन (Pushpraj Jain Detained)उर्फ ​​पंपी जैन यांना आयकर विभागाने ताब्यात घेतले आहे. आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना त्यांच्यासोबत कन्नौजहून कानपूरला घेऊन गेले. यासोबतच पथक अनेक बॅगमध्ये कागदपत्रे घेऊन जाताना दिसले.

आयकर विभागाने (Income Tax) पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणांवर धाड  (Raid) टाकली आहे. जवळपास 72 तासांहून अधिक काळ हे धाडसत्र सुरु आहे. सकाळी आयकर विभागाचे काही अधिकारी आणि पुष्पराज जैन यांच्या घरी पोहोचले. यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक पुष्पराज जैन यांना सोबत घेऊन जाताना दिसले. कनौज येथील पुष्पराज जैन यांच्या घरी आणि कारखान्यात अजूनही पोलीस उपस्थित असल्याची माहिती आहे.

कोण आहेत पुष्पराज जैन?2016 मध्ये पुष्पराज जैन इटावा-फर्रुखाबाद येथून विधान परिषदेवर निवडून आले. ते प्रगती अरोमा ऑइल डिस्टिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सह-मालक आहेत. 1950 मध्ये त्यांचे वडील सावलाल जैन यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला होता. पुष्पराज जैन आणि त्यांचे तीन भाऊ कन्नौजमध्ये व्यवसाय करतात आणि एकाच घरात राहतात. पुष्पराज जैन यांचे मुंबईतही घर आणि कार्यालय आहे, तेथून ते मुख्यतः मध्य पूर्वेतील जवळपास 12 देशांमध्ये निर्यातीचे व्यवहार करतात. त्यांच्या तीन भावांपैकी दोन भाऊ मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करतात तर तिसरा त्याच्यासोबत कन्नौजमध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग सेटअपवर काम करतो.

पुष्पराज जैन यांच्याकडे किती मालमत्ता आहे?2016 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पुष्पराज जैन आणि त्यांच्या कुटुंबाकडे 37.15 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 10.10 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्यांनी कन्नौजमधील स्वरुप नारायण इंटरमीडिएट कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शुक्रवारी छापे सुरू झाल्यानंतर पुष्पराज यांनी पीयूष जैन यांच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीIncome Taxइन्कम टॅक्स