UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालेचे पहिले कल पाहता भाजपानं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. समाजवादी पक्ष पिछाडीवर असूनही पक्षाचा जोश अजूनही कायम आहे. समाजवादी पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीचे कल दाखवणारे टेलिव्हिजन वाहिन्या पाहू नयेत आणि धीर धरावा शेवटी विजय 'सपा'चाच होईल, असं ट्विट समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर करण्यात आलं आहे.
"सभी समाजवादी कार्यकर्ते आणि सहयोगी पक्षांच्या कार्यकर्त्यंना आवाहन आहे की त्यांनी टेलिव्हिजनवर दाखवले जाणारे निवडणुकीचे कल पाहू नयेत. सर्वांनी आपापल्या बुथवर ठाम उभं राहावं. अखेरीस लोकशाहीचाच विजय होईल आणि निकाल सपाच्या बाजूनं लागेल", असं ट्विट समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात सध्या ४०३ जागांपैकी भाजपानं २६९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सपाकडे १२४ जागांवर आघाडी आहे. बसपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी ३ उमेदवार आघाडीवर आहेत.