शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

Uttar Pradesh Election 2022 : प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत कौल कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 7:55 AM

Uttar Pradesh Election 2022 : अयोध्येत भाजप-समाजवादी पार्टीत थेट लढत

योगेश बिडवईअयोध्या : प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत यंदा मतदार कुणाला कौल देणार, याची सर्व देशाला उत्सुकता लागली आहे. अयोध्या जिल्ह्यात ५ जागा असून अयोध्या विधानसभा मतदार संघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. 

अयोध्येतून भाजपचे विद्यमान आमदार वेद प्रकाश गुप्ता आणि माजी राज्यमंत्री तेज नारायण उर्फ पवन पांडे आखाड्यात उतरले आहेत. गेल्या वेळी गुप्ता ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. मात्र यंदा त्यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून का निवडणूक लढविली नाही, यावरही मतमतांतरे आहेत. ब्राह्मण (टंडन) समाजाचे व बाहुबली म्हणून ओळखले जाणारे उमेदवार पवन पांडे यांनी आव्हान उभे केले आहे.

तर व्यापारी समाजाचे असलेले गुप्ता यांना विकास कामांमुळे दुकाने हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईमुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. त्याचा त्यांना किती फटका बसतो, यावर त्यांचे भवितव्य ठरेल. भाजपने राम मंदिर निर्माण व अयोध्या नगरीचा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून सुरू असलेल्या प्रवासाचा मुद्दा पुढे आणला अाहे. तर विकासाच्या नावाखाली भाजपने लूट चालविली असून गुजरातच्या कंत्राटदारांकडे शहर सोपविले जात असल्याचा दावा समाजवादी पार्टीने केला आहे.

जातीची गणिते महत्त्वाची

  • अयोध्या विधानसभा मतदार संघात ब्राह्मण, यादव, मुस्लीम, दलित समाजाचे प्रमुख मतदार आहेत. व्यापारी समाजही मोठ्या संख्येने आहे.
  • अयोध्या आणि फैजाबाद या दोन शहरांनी मिळून अयोध्या महापालिका तयार झाली आहे. दोन्ही शहरांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. 

व्यापारी भाजपवर का आहेत नाराज?

  • अयोध्या विकास प्राधिकरण शहरात विविध विकास कामे करत आहे. त्यात सर्व रस्ते रूंद होणार आहेत. 
  • त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूची दुकाने हटविली जातील. त्यांना शहरात कुठे जागा मिळेल, या प्रश्नाने व्यापारी हवालदिल झाले आहेत. 
  • हनुमान गढीमध्ये हाच मुद्दा चर्चेत आहे. त्यातून व्यापारी भाजपवर काहीसे नाराज आहेत.