नवी दिल्ली : चीनच्या TikTok वर देशात बंदी आणण्यासाठी मोहिम सुरु आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनीही चीनच्या 30 धोकादायक अॅपच्या यादीमध्ये हे अॅप टाकले आहे. या चिनी अॅपविरोधात आता भारताचे आणखी एक अॅप उतरले आहे. या अॅपचे नाव आहे चिंगारी.
या आधी मित्रो या अॅपने TikTok ला टक्कर देण्यास सुरुवात केली होती. मात्र, भारतीयाच्या देशभक्तीच्या भावनांशी या अॅपचे निर्माते खेळले होते. मित्रो या अॅपचा सोर्सकोडच नाही तर हुबेहूब अॅप पाकिस्तानकडून घेण्यात आल्याचा खुलासा झाला होता. यानंतर या अॅपची रेटिंग घसरू लागली होती. गुगलने तर हे अॅप स्टोअरवरून काढून टाकले होते.
आता चीनच्या अॅपला टक्कर देण्यासाठी भारताचे चिंगारी अॅप (Chingari) आले आहे. या अॅपला मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे. हे अॅप विकसित कराणाऱ्यांनी सांगितले की, मेड इंन इंडिया अॅपची लोकप्रियता वाढू लागली आहे. केवळ 72 तासांत 5 लाखांवर डाऊनलोड मिळाले आहेत. टिकटॉकसारखेच चिंगारी अॅपही लहान व्हिडीओ शेअर करण्यासाठी आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा फायदा मिळत आहे. चिंगारीचे डेव्हलपर बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी सांगितले की, चिंगारी अॅपचे सबस्क्रायबर वाढू लागले आहेत. आपल्या अॅपने टिकटॉकचे क्लोन अॅप मित्रों (Mitron) लाही मागे टाकले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप पहिल्या नंबरवर ट्रेंड करत आहे.
कसे आहे अॅप...चिंगारीवर व्हिडिओ अपलोड, डाऊनलोड केले जाऊ शकतात. याशिवाय यामध्ये मित्रांशी चॅटिंग, नवीन लोकांशी मैत्री, चॅटिंग, ब्राऊझिंगसह व्हॉट्सअॅप स्टेटस, ऑडिओ क्लिप्स, GIF स्टीकर आणि फोटोंसोबत क्रिएटिव्हीटी केली जाऊ शकते.
Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले
मित्रोची पोलखोलमित्रों हे अॅप कोणा भारतीय आयआयटीच्या विद्यार्थ्याने विकसित केलेले नाहीय. तर या अॅपचा सोर्स कोड म्हणजेच डेव्हलपरच्या कोडसह, त्या अॅपमधील फिचर, युजर इंटरफेस हा जसाचे तसा एका पाकिस्तानी कंपनीकडून विकत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी सॉफ्टवेअर निर्माता कंपनी Qboxusचे संस्थापक आणि मुख्य संचालक इरफान शेख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला
Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा
'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...
India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?
India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात