ऑनलाइऩ लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - वर्णद्वेषाच्या मुद्यावर बोलताना भाजपाचे माजी खासदार तरुण विजय यांनी दक्षिण भारतीयांबद्दल धक्कादायक विधाने केली आहेत. तरुण विजय यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. ग्रेटर नोएडामध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंबंधी अल जझीरा वृत्तवाहिनीने एक डिबेट शो आयोजित केला होता.
त्या कार्यक्रमामध्ये बोलताना तरुण विजय यांचे भान सुटले आणि त्यांनी धक्कादायक विधाने केली. भारतीय संस्कृतीचे महत्व सांगताना विजय यांनी वादग्रस्त विधाने केली. आम्ही वर्णद्वेषी असतो तर, दक्षिण भारतीयांसोबत का राहीलो असतो ?. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांसोबत का राहिलो असतो ? आमच्या अवतीभवती काळे लोक रहतात अशी धक्कादायक विधाने तरुण विजय या व्हिडीओमध्ये करताना दिसत आहेत.
आपण काय बोललो आहोत हे लक्षात आल्यानंतर तरुण विजय यांनी टि्वटरवरुन माफी मागितली. मला वाईट वाटतेय, मी माफी मागतो असे टि्वट विजय यांनी केले आहे.
Mywords perhaps were not enough to convey this.Feel bad,really feel sorry, my apologies to those who feel i said different than what I meant https://t.co/I7MddEJk5W— Tarun Vijay (@Tarunvijay) April 7, 2017