क्षयरोग उच्चाटनासाठी विशेष मोहीम ( नवीन बातमी )
By admin | Published: March 25, 2015 9:09 PM
पुणे : देशातील क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत येरवडा येथील गांधीनगर परिसरात प्रेरणा जेष्ठ नागरिकसंघ यांच्या वतीने क्षयारोगाविषयक जनजगृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या मोहीमेची सुरूवात गुढीपाडव्याचा मुहूर्तसाधत क्षयरोग निर्मूलनाची विशेष गुढी उभारून करण्यात आलेली आहे. या जनजागृती कार्यक्रमात समाजामध्ये अजून सुद्धा टीबी सारखा रोग झाला तर त्याला त्वरित दवाखान्यात न नेता एखाद्या भोधू बाबाकडे किंवा कोणी करणी केलिका म्हणून ढोंगी साधू कडे गेऊन जातात आणि त्यामुळे रुग्ण दगावतो याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी शहर क्षयरोग अधिकारई डॉ.नरेंद्र ठाकूर , गांधीनगर क्षयरोग विभागाचे कर्मचारी प्रसाद स
पुणे : देशातील क्षय रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलत या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत येरवडा येथील गांधीनगर परिसरात प्रेरणा जेष्ठ नागरिकसंघ यांच्या वतीने क्षयारोगाविषयक जनजगृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या मोहीमेची सुरूवात गुढीपाडव्याचा मुहूर्तसाधत क्षयरोग निर्मूलनाची विशेष गुढी उभारून करण्यात आलेली आहे. या जनजागृती कार्यक्रमात समाजामध्ये अजून सुद्धा टीबी सारखा रोग झाला तर त्याला त्वरित दवाखान्यात न नेता एखाद्या भोधू बाबाकडे किंवा कोणी करणी केलिका म्हणून ढोंगी साधू कडे गेऊन जातात आणि त्यामुळे रुग्ण दगावतो याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी शहर क्षयरोग अधिकारई डॉ.नरेंद्र ठाकूर , गांधीनगर क्षयरोग विभागाचे कर्मचारी प्रसाद सोनवणे, नंदा गायकवाड ,मयुरेश पवार ,सतीश गायकवाड, जावेद नदाफ, आणि आश्रय संस्थेच्या अध्यक्षा रश्मी शागीरल,बापू कांबळे हे उपस्थित होते. तसेच या मोहीमे अंतर्गत चित्रपट प्रदर्शन, पथनाटये तसेच माहिती पत्रकांद्वारे विशेष जनजागृती करण्यात आली. ===================