Special Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची विशेष सीरिज जारी करणार आहेत. ही नाणी अतिशय खास आहेत, कारण विशेष सीरिज असलेली ही नाणी अगदी अंधांनाही सहज ओळखता येतील. आज होणाऱ्या वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी या नाण्यांचे अनावरण होईल. पीएमओने ही माहिती दिली आहे.
PMO ने एक निवेदन जारी केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून 2022 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह सोहळ्याचे उद्घाटन करतील. आज सकाळी 10.30 वाजता 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची विशेष मालिका जारी केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
ही नाणी खास का आहेत?विशेष सीरिजअंतर्गत या नाण्यांवर AKAM चा लोगो असेल. पीएमओच्या निवेदनात म्हटले आहे की, नाण्यांच्या या विशेष मालिकांमध्ये AKAM च्या लोगोची थीम असेल आणि दृष्टिहीनांनाही सहज ओळखता येईल. 6 ते 11 जून 2022 'आझादी का अमृत महोत्सव' (AKAM) चा भाग म्हणून साजरा केला जात आहे.