विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतली ओळख परेड तासभर बैठक : जिल्ाची माहिती घेतली जाणून
By admin | Published: January 05, 2016 11:39 PM
(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)जळगाव- विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन अधिकार्यांसह जिल्ाची ओळख करून घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा प्रभार घेतल्यानंतर चौबे यांची ही जिल्ातील पहिलीच व धावती भेट होती. मध्यरात्री आलेचौबे सोमवारी मध्यरात्री शहरात आले. पोलीस मेसमध्ये त्यांचा मुक्काम होता. नंतर मंगळवारी सकाळी त्यांनी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या दालनात उपविभागीय अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या वेळी अधीक्षक सुपेकर यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते. बैठकीत सर्व अधिकार्यांशी चौबे यांनी चर्चा केली. त्यांचा परिचय करून घेतला. जिल्ातील तालुके, संवेदनशील भाग, स्थानिक गुन्हे शाखेची रचना, शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या व रचना आदी माहिती चौबे यांनी घेतली. सुमारे तासभर वरिष्ठ अधिकारी व चौबे यांच्यात चर्चा झाली. चर्चेचा अधिकचा तपशील पोलीस विभागाकडून मिळाला नाही. तक्रारदाराने अडविले चौबेंनाविशेष पोलीस महानिरीक्षक चौबे यांची बैठक आटोपल्यानंतर ते पोलीस अधीक्षक यांच्या दालनातून बाहेर पडले. बाहेर तुकारामवाडीमधील देवीदास चंदनकर हे आपल्या तक्रारींसंबंधी पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाबाहेरच उभे होते. यातच चौबे बाहेर पडल्यावर चंदनकर थेट त्यांच्या मार्गात आले. त्यांनी आपली संपत्ती व मालमत्ता नातेवाइकांनी फसवून घेतल्याची तक्रार चौबे यांच्याकडे केली. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यावर चौबे यांनी तक्रारदार चंदनकर यांना याबाबत अधिकच्या किंवा पुढील कार्यवाहीसंबंधी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधा, अशी सूचना केली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर चौबे हे नाशिककडे दुपारी रवाना झाले.