विशेष पान कलाम/ प्रतिक्रिया जोड पाकिस्तान, इस्रायलच्या दूतावासांकडून आदरांजली
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM
कलाम यांचे पार्थिव १० राजाजी मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असता दिल्लीतील विविध देशांच्या राजदूतांनी तेथे जाऊन आदरांजली अर्पण केली. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित आणि इस्रायलचे राजदूत डॅनियल कमार्ेन यांचा त्यात समावेश होता. अब्दुल कलाम हे प्रेरणादायी वैज्ञानिक आणि नेते होते. त्यांच्या निधनामुळे भारतवासीयांना झालेल्या दु:खात सहभागी आहोत, असे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले.
कलाम यांचे पार्थिव १० राजाजी मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असता दिल्लीतील विविध देशांच्या राजदूतांनी तेथे जाऊन आदरांजली अर्पण केली. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित आणि इस्रायलचे राजदूत डॅनियल कमार्ेन यांचा त्यात समावेश होता. अब्दुल कलाम हे प्रेरणादायी वैज्ञानिक आणि नेते होते. त्यांच्या निधनामुळे भारतवासीयांना झालेल्या दु:खात सहभागी आहोत, असे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले. -----------------------थोर सुपुत्र गमावला- रा.स्व. संघ कलाम यांच्या निधनामुळे देशाने थोर सुपुत्र गमावला आहे. ते द्रष्टे वैज्ञानिक होते. त्यांनी असंख्याच्या मनात स्वप्ने पेरली. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही शोकसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, असे सरसंघचालक मोहन भागवत, सरचिटणीस सुरेश(भय्या) जोशी यांनी एका निवेदनात म्हटले. ---------------------मणिपूरमध्येही सात दिवसांचा शोकदरम्यान मणिपूर सरकारने सात दिवसांचा शोक जाहीर केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार २७ जुलै ते २ ऑगस्ट या काळात दुखवटा पाळला जाणार असून मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले जातील, असे राज्य सरकारच्या सूत्रांनी म्हटले.