हरीश गुप्ता नवी दिल्ली : गांधी कुटुंबाच्या सदस्यांचे संरक्षण व सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी ‘एसएसजी’ (स्पेशल सिक्युरिटी ग्रुप) या नावाची विशेष शाखा निर्माण केल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसएसजीची निर्मिती पोलीस सह आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याखाली केली गेली असून तो केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) सुरक्षा दल शाखेसोबत समन्वय राखील. एसएसजी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) जागा घेईल. एसपीजीने गांधी कुटुंबातील सदस्य आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सुरक्षा पुरवली आहे.
सीआरपीएफच्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षा शाखेसोबत एसएसजीच्या प्रभारीने अतिशय जवळून समन्वय राखल्यानंतर ही नवी सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात आली आहे. सीआरपीएफ ताबडतोब गांधी कुटुंब आणि प्रियांका वाड्रा आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा पुरवील आणि दिल्ली पोलीस बाहेरील सुरक्षा कवच देतील. सीआरपीएफचे महा निरीक्षक (गुप्तचर आणि व्हीआयपी सुरक्षा) पी. के. सिंह यांनी फक्त गांधी कुटुंबासाठीच नव्हे तर इतर अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अतिशय कठोर, असे सुरक्षा नियम बनवले आहेत.
वस्तुस्थिती अशी आहे की, वाहने आणि तांत्रिक उपकरणे इत्यादीसह बºयाच सोयीसुविधा या एसपीजीत होत्या त्या सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेला दिल्या जात आहेत. सीआरपीएफ गांधी कुटुंबासह देशात ६० पेक्षा जास्त अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा स्थानिक पोलिसांचे साह्य व मदतीसह करीत आहे. झेड प्लस वर्गात १५, झेड वर्गात २१ आणि राहिलेले इतर वर्गवारीत मोडतात.आता एनएसजीचे रुपांतर पूर्णपणे दहशतवादविरोधी कारवायांत केले जात आहे व यापुढे ते देशात कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा कवच पुरवणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जी सुरक्षा उपलब्ध आहे ती गांधी कुटुंबाला दिली गेली आहे.सुधारित नियमकेंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. गांधी कुटुंबाची सुरक्षा ही अॅडव्हान्स सिक्युरिटी लिएसन (एएसएल) आणि स्पेशल आर्मर्ड व्हेईकल्ससह (एसएव्ही) कायमच सज्ज असेल.