शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

सुनंदा यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक

By admin | Published: January 07, 2015 11:55 PM

सुनंदा यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका पत्राने या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे़

शशी थरूर यांचा आरोप : दिल्ली पोलिसांकडून घरगड्याचा शारीरिक, मानसिक छळनवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ वाढलेले असतानाच, सुनंदा यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका पत्राने या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे़ दिल्ली पोलिसांकडून आपल्या एका घरगड्यावर दबाव टाकण्यात येत असून त्याचा शारीरिक व मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप, थरूर यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे़ मी आणि माझ्या घरगड्याने मिळून सुनंदाची हत्या केल्याचे कबूल करावे, यासाठी हा दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप यात थरूर यांनी केला आहे़या संपूर्ण घडामोडीदरम्यान थरूर यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना गत १२ नोव्हेंबरला लिहिलेले एक पत्र उघड झाले आहे़ या पत्रात थरूर यांनी त्यांच्या नारायणसिंग नामक घरगड्यावर पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे़ मी स्वत: आणि माझे सहकारी सुनंदा प्रकरणाच्या तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत आहे़ अशा स्थितीत माझ्या घरगड्यावर अशाप्रकारे दबाव टाकणे आणि त्याला मारहाण करणे, हे माझ्यासाठी धक्कादायक आहे, असे थरूर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे़ दरम्यान सुनंदा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे़ या पथकाने बुधवारी आपला तपास सुरू केला़ दरम्यान हे हत्येचे प्रकरण आहे, हे मानण्यामागे सकृतदर्शनी अनेक कारणे असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़बस्सी यांनी म्हटले आहे़सुनंदांच्या मृत्यूच्या वर्षभरानंतर गुन्हा का? असे विचारले असता बस्सी यांनी सांगितले की, एम्सच्या अंतिम अहवालानंतर एफआयआर दाखल करणे गरजेचे झाले होते़ याप्रकरणी थरूर यांची चौकशी होणार का? असे विचारले असता, अशी शक्यता नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले़ तपासकर्त्यांनी सुनंदा यांचे विसेरा नमुने ब्रिटन वा अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविण्याची तयारी चालवली आहे़ जेणेकरून सुनंदा यांना देण्यात आलेल्या विषाबाबत माहिती मिळू शकेल़ सुनंदांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्यात आल्याचे मानले जाते़ भारतीय प्रयोगशाळेत या विषाचा शोध अशक्य आहे़(लोकमत न्यूज नेटवर्क)सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने केरळच्या तिरुवनंतपूरम येथे एका रुग्णालयाचा दौरा केला़ सुनंदा मृत्यूच्या काही दिवस आधी या रुग्णालयात भरती होत्या़ एसआयटीकडून थरूर यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि खासगी कर्मचारी तसेच सुनंदांचा मृत्यू झालेल्या पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते़ हॉटेलच्या डॉक्टरचीही चौकशी होऊ शकते़ या डॉक्टरनेच सुनंदा यांना मृत घोषित केले होते़सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसंदर्भात एम्सच्या वैद्यकीय बोर्डाने दिलेल्या अहवालात, हत्या झाल्याचा उल्लेख नसून केवळ विष हे मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले आहे़ एम्सच्या याच अहवालाच्या आधारावर मंगळवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता़बुधवारी या बोर्डाचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, आमच्या अहवालात मृत्यू हत्या असल्याचे म्हटलेले नाही़ केवळ विषाने मृत्यू झालेला आहे, एवढेच आमच्या अहवालात नमूद आहे़ आता पुढील तपास करणे पोलिसांची जबाबदारी आहे़